गप्पा गणिताच्या (The Math Gossips)
गणित (Mathematics) या विषयाला, 'सर्वात जास्त अवघड विषय' अशी ओळख प्राप्त झाल्याचे हल्ली दिसून येते. शालेय मुलांना विचारले, की "तुम्हला कोणता विषय अवघड जातो", सामान्यपणे सर्वांचे बोट 'गणिताकडे' जाते. पण खरंच तसे आहे का? या प्रश्नाचे उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करू😊. आपण जीवन जगत असताना आपल्या सभोताली सर्वत्र गणिताचा वावर आहेच.. मग ज्या वातावरणात आपण श्वास घेतो, तिथली हवा, पाणी आपल्याला प्रतिकूल कशी बरे असू शकेल?? तरीही, गणिताचा बाऊ हा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होण्याची बरीच कारणे आहेत. त्यांना गणिताचे अध्यापन करण्याच्या पद्धती, पुस्तकी गोष्टींवर भर, पाठ करण्याच्या सवयी, विद्यार्थ्यांची गणित अध्ययन करण्याची पद्धत, विद्यार्थ्यांनी गणिताकडे फिरवलेली पाठ, इत्यादी. गणित हा विषय इतर विषयांच्या तुलनेत थोडा वेगळा आहे नक्की, पण परीक्षेत पूर्ण गुण गणित आपल्याला मिळवून देऊ शकते याची पूर्ण शास्वती असते. हा, पण गणितात शिस्तीला खूप महत्व आहे. आता गणितातील शिस्त म्हणजे नेमके काय?? सांगत...